Sunday, November 17, 2024

/

या उपक्रमासाठी सलग 7 तास स्केटिंग 

 belgaum

125 मीटर परिघ असलेल्या स्केटिंग रिंकच्या 750 फेऱ्या मारत सलग 7 तास तब्बल 92 कि.मी. स्केटिंग करत यशपाल चोगसिंग पुरोहित या शालेय स्केटिंगपटूने सोमवारी ‘गोहत्या बंदी’संदर्भात एक आगळीवेगळी जनजागृती केली.

शहरातील केएलई सोसायटीच्या लिंगराज महाविद्यालय स्केटिंग रिंगवर रविवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोमाता की सुरक्षा प्रकृति की रक्षा! गाय हमारी माता है अमृत की दाता है! गोहत्या बंद करो पशुधन बचाओ! या शीर्षकाखाली गोहत्या बंदी जनजागृतीसाठी ज्ञानमंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी असलेल्या 14 वर्षीय यशपाल पुरोहित याच्याकडून हा उपक्रम राबविला गेला.

श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगाव जिल्हा अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते ध्वज दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उमेश कलघटगी, राकेश कलघटगी, राजू माळवदे, जोगसिंग, रमेशसिंग, चोकसिंग, बसवराज कोरी शेट्टी, सूर्यकांत हिंडलेकर, करुणा वागळे, अमेय घाडगे, तेजस लमानी, आदर्श निकम, सामधी कांगले, विहान कांगले, श्री रोकडे, अविनाश कोरीशेट्टी यांच्यासह बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचे स्केटर्स व पालक उपस्थित होते.

गोहत्या बंदी संदर्भातील हा जनजागृती कार्यक्रम उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर श्रीराम सेना हिंदुस्तान चे बेळगाव जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते यशपाल पुरोहित याला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी आमदार एडवोकेट अनिल बेनके राजू माळवदे विक्रम पुरोहित गुरु अलका राजू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

युनिक स्पोर्टिंग अकॅडमी, रोटरी क्लब ऑफ विणूग्राम, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार, मारवाडी युवा मंच बेळगाव, मारवाडी उडान युथ विंग, कोल्हापूर कन्या मंडळ, श्री केतेश्वर युवा सेवा बेळगाव, स्विमरस क्लब बेळगाव, एक्वेरियम स्विम क्लब बेळगाव आणि श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगाव यांच्या सहकार्याने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.