मागील चार दिवसांपासून थंडीने जोर घेतला असतानाच आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने झोडपून झाल्यानंतर ढगाळ वातावरण कायम होते. आता पुन्हा चिंता वाढली आहे ती म्हणजे अनेकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले.
बेळगावचा पारा सात अंशावर गेले असतानाच आता ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे काही प्रमाणात सुगीच्या बाबत अडथळा निर्माण होणार असून याचा विचार करून शेतकरी काळजीत आहेत. तालुक्यात 80 टक्के सुगीचे काम आटोपते असले तरी उर्वरित 20 टक्के काम सुरू केले आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण यामुळे अडसर निर्माण करणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या पेरनीचे काम सुरू आहे. याचा विचार करून शेतकरी रब्बी पिके घेण्यावर भर देत आहेत. मात्र उगवलेल्या पिकाला जर पाऊस पडला तर ती खराब होतील अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त करण्यात येत आहे. याचा विचार करून सध्यातरी पाऊस नको रे बाबा अशीच अवस्था निर्माण झाली आहे. थंडीमुळे पिके जोमात येत असतानाच आता ढगाळ वातावरण निर्माण झालेले चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या काही प्रमाणात पेरणीची कामे आटोपती झाली असली तरी बहिणीची कामेही पूर्ण प्रमाणात होण्याच्या मार्गावर आहेत. याचा विचार करून शेतकरी पुन्हा कामाला लागले असतानाच सोमवारी ढगाळ वातावरण निर्माण झालेली एकदा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण कधी गायब होणार याकडेच साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.