बेळगाव रेल्वे स्थानकावरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करताना नैऋत्य रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी तब्बल 36 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले आहेत.
देशभरातील एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन नागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नैऋत्य रेल्वेने बेळगाव रेल्वे स्थानकावरील वेटिंग हॉल, रिझर्वेशन काऊंटर, पार्किंग एरिया मुख्य प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्याचा मार्ग, बुकिंग ऑफिस, प्लॅटफॉर्मसह ओव्हर ब्रिज याठिकाणी एकूण 36 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
निर्भय फंडांतर्गत नैऋत्य रेल्वेने आपल्या कार्यक्षेत्रातील 31 रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत 31 पैकी बेळगावसह 6 रेल्वे स्थानकावर ही सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या पद्धतीच्या सीसीटीव्ही व्हिडिओ सरव्हिलन्सची व्यवस्था असणाऱ्या रेल्वे स्थानकामध्ये बेळगावसह बळ्ळारी, वास्को-द-गामा, बेंगलोर कॅन्टोन्मेंट, बंगारपेठ आदी रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.