भानामती आणि अंधश्रद्धा सारखे प्रकार आजही काही कमी दिसून येत नाहीत. त्यामुळे विकृतीच्या परिसीमा गाठणाऱ्यांना कोणत्या शब्दात सांगावे आता हाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्या ठिकाणी लिंबू गुलाब याच भोपळे नको नको ते साहित्य फेकून आपले चांगले होणार अशा आविर्भावात वावरणाऱ्याची संख्याही कमी नाही. असे करणार्या नागरिकांना सध्या तरी भानावर आणण्याची गरज निर्माण वाटू लागले आहे.
काकती येथील एका ब्रिजजवळ असाच प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे ये-जा करणार्या नागरिकांतून तीव्र तिखट प्रतिक्रिया उठत आहेत. बाहुले चार लिंबू त्याला टोचून एका भोपळ्यावर ते ठेवून देण्यात आले आहे. त्याच्यावर गुलाल फेकून देण्यात आला आहे. त्यामुळे विकृतीच्या परिसीमा काय असतात हे यावरून दिसून येते. यापुढे तरी शहाणे व्हावे अशी आशा सार्याना लागून राहिली आहे.
बेळगाव शहर परिसरात तसेच तालुक्यात असे भानामतीचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे यावर दक्षता ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात येत असताना असे करणाऱ्यां चे मानसिकता काळाच्या ओघात हरवली आहे का? असाच प्रश्न निर्माण झाला आहे.
भागमती हा प्रकार आता नव्या रूपातील उजेडात येऊ लागला आहे. यापुढे तरी भानामती करणाऱ्यांचे डोके ठिकाणावर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. या भानामतीमुळे अनेकांना मानसिक आणि शारीरिक त्रास झाल्याच्या घटना उघडकीस आले आहेत. यापुढे तरी नागरिकांमधील मानसिकता बदलण्याची गरज व्यक्त होत आहे. असे प्रकार करणाऱ्यावर चाप बसण्याची गरज व्यक्त होत आहेत.