Saturday, December 21, 2024

/

बेळगावच्या कन्येचा खेलो इंडिया मध्ये दुसऱ्यांदा सुवर्णवेध

 belgaum

खेलो इंडिया मध्ये सतत दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवत हलग्याच्या कन्येने बेळगावचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर उज्वल केलं आहे.वेटलिफ्टर अक्षता कामती हिने आसाम मध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत 81 किलो वजन गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

मंगळवारी दुपारी झालेल्या स्पर्धेत तिने ही कामगिरी करत यावर्षीदेखील सुवर्णपदक पटकावले आहे.कोलकाता येथे होणाऱ्या सिनियर नॅशनल स्पर्धेत सहभागी होणार आहे.

मागील वर्षी पुणे येथील खेलो इंडिया 76 किलो वजन गटात 176 किलो वजन उचलत नवीन रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली होती.आता पर्यंत अक्षता हिने पाच राष्ट्रीय स्पर्धातून मेडल मिळविली आहेत.तर सिनियर नॅशनल मध्ये दोन अशी सात पदक मिळवली आहेत.

Akshta kamati
Akshta kamati weightlifter

मागील वर्षी ज्युनिअर वेट लिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदकाची तिने कमाई केली होती या नंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिची दखल घेत मन की बात या कार्यक्रमात तिचे खास कौतुक केलं होतं.हलगा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अक्षता हिने वेटलिफ्टिंग सारख्या खेळात राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अक्षता ही सध्या बंगळुरू मधील साई स्पोर्ट्स मध्ये सराव करत असून प्रशिक्षक श्यामला शेट्टी,रणजीत व बेळगावचे सदानंद मालशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.