इथून पुढे होऊ घातलेल्या येळ्ळूर, कडोली आधी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातून वक्ते वा साहित्यिकांना आमंत्रण देऊ नका, असे आडमुठे धोरण बेळगाव जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आहे.
मंगळवारी सायंकाळी बेळगाव च्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साहित्य संमेलनाचे आयोजक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठक झाली त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर एस बी बोमनाळी आणि साहित्य संमेलनाच्या आयोजकांना महाराष्ट्रातील साहित्यिकांना आमंत्रण देऊ नका अशा सूचना केल्या गेल्या कित्येक दिवसापासून बेळगाव परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे त्यामुळे यावर्षी आपण महाराष्ट्रातील साहित्यिकाना आमंत्रण देऊ नये अश्या सूचना स्थानिक साहित्यिकांना घेऊन साहित्य संमेलन करावीत असे देखील यांनी सूचित केले.
येळ्ळूर आणि कडोली येथील साहित्य संमेलन आयोजकांनाही यापूर्वीच आपण महाराष्ट्रातील साहित्यिकाना आमंत्रण दिली आहेत असे सांगितले.
साहित्यिक प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असणारे कर्नाटक प्रशासन साहित्यक्षेत्रात हस्तक्षेप करत आहे. ही साहित्य क्षेत्राची हानी करणारी गोष्ट आहे. त्याला वेळीच आवर करणे गरजेचे आहे, जर वृत्ती फोफावली तर भारतीय साहित्य क्षेत्राचे अपरिमित हानी होईल. त्या समाजाचा विकास करते. तत्कालीन समाजजीवनाचे नोंद ठेवते. हा दस्तऐवज निर्माण करणारी प्रक्रिया थांबू नये अशी मराठी भाषिकांची इच्छा आहे.
भारतीय सर्व भाषांचा संवर्धन करण्याचं केंद्र शासनाचे धोरण आहे., या धोरणाचाच भारता फासण्याचे काम कर्नाटक शासन करत आहे. त्याला योग्यवेळी केंद्रशासनाने पायबंद घातला पाहिजे.