बेळगावच्या कायदा सुव्यवस्था विभागाच्या डीसीपी सीमा लाटकर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सिमी मारियाम जॉर्ज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सीमा लाटकर यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यात मोलाची कामगिरी बाजवली होती.

कर्तबगार आणि कडक पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी बेळगावात आपली छाप उमटवली होती.बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी भागात मटका जुगार अड्डयावरील धाड व महिलांच्या साठी त्यांनी काम विशेष चर्चेत होत.
3 जुलै 2017 साली त्या बेळगाव कायदा आणि सुव्यवस्था भागाच्या डी सी पी म्हणून रुजू झाल्या होत्या.बेळगावात त्यांनी 2 वर्षे पाच महिने सेवा बजावली आहे.नूतन डी सी पी सिमी जॉर्ज या लवकरच पदभार घेणार आहेत.