नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज फडकवणाऱ्या कार्यकर्त्यांना हिरेबागेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.1 जानेवारी रोजी राज्योत्सव साजरा केला जावा.उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य म्हणून घोषणा करावी अशा मागण्या उत्तर कर्नाटक आंदोलन समितीच्या होत्या.
उत्तर कर्नाटक आंदोलन समितीने एक जानेवारी रोजी उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्याचा ध्वज फडकविण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार
वेगळ्या उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज फडकविण्याचा प्रयत्न केला जात असताना हिरेबागेवाडी पोलिसांनी धाव घेऊन वेगळ्या राज्याचा ध्वज फडकवणाऱ्या व्यक्तींना अटक केली.
उत्तर कर्नाटक आंदोलन समितीचे अध्यक्ष अडीवेश इटगी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.कर्नाटकात देखील नवीन राज्याची मागणी वाढू लागली आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे सध्या भीमा शंकर पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या नंतर दोन्ही राज्यात वातावरण पेटलं असताना बेळगाव तालुक्यात वेगळ्या राज्याचा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न झाला आहे.