मंजुनाथ लिंगाप्पा पुजारी हा एक सर्वसामान्य ऑटोरिक्षा चालक असला तरी गरजूंसाठी रुग्णवाहिका अर्थात ऍम्ब्युलन्स म्हणून विनाशुल्क आपल्या ऑटोचा वापर करण्याच्या त्याच्या आगळ्यावेगळ्या समाज कार्याची चक्क इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे.
मंजुनाथ लिंगाप्पा पुजारी हा ऑटोरिक्षा चालक दररोज रात्रीच्या वेळी आपली ऑटोरिक्षा ॲम्बुलन्स म्हणून गरजू लोकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचे आदर्शवत काम करतो मंजुनाथ पुजारी यांच्या या कार्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने आपल्या 2020 सालच्या नव्या सुधारित आवृत्ती मध्ये घेतली आहे. मंजुनाथ पुजारी अर्थार्जनासाठी दररोज सायंकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत आपल्या ऑटोरिक्षाचा वापर प्रवासी वाहतूक करण्याबरोबरच तातडीच्या वैद्यकीय उपचाराची गरज असणाऱ्यांसाठी ॲम्बुलन्स म्हणून देखील करतो. रुग्णवाहिका अर्थात ऍम्ब्युलन्स म्हणून आपल्या ऑटोरिक्षाचा वापर करताना मात्र मंजुनाथ संबंधित रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना कोणतेही भाडे आकारत नाही.
रुग्ण शहरातील कोणत्याही भागात असो त्याठिकाणी जाऊन त्याला तो सांगेल त्या संबंधित दवाखाना अथवा हॉस्पिटलमध्ये तातडीने पण काळजीपूर्वक पोहोचविण्याचे काम मंजुनाथ मनापासून करतो. आपल्या या समाजकार्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्याच्या ॲम्बुलन्स सेवेचा लाभ घेता यावा यासाठी मंजुनाथने आश्रय फौंडेशन या एनजीओची मदत घेण्यास सुरुवात केली आहे.
दिवसभर कार्यालयात नोकरी केल्यानंतर ऑटोरिक्षाचा व्यवसाय करणारा मंजुनाथ पुजारी रात्री कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी आपली मोफत ऍम्ब्युलन्स सेवा देण्यासाठी सज्ज असतो. आतापर्यंत आपल्या ऑटोरिक्षाचा ऍम्ब्युलन्स म्हणून वापर करून मंजुनाथने आतापर्यंत 40 हून अधिक लोकांचे प्राण वाचविले आहेत.
मंजुनाथ हा दिवसभर शहरातील एका इन्फ्रास्ट्रक्चर अँड फायनान्शियल सर्व्हिस कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतो. कामावरून घरी परतल्यानंतर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी तो ऑटो रिक्षा चालवतो. कांही वर्षांपूर्वी मंजुनाथ पुजारी याच्या घराशेजारील एका गरोदर महिलेवर प्रसूतीला जाण्यासाठी वेळेवर ऑटोरिक्षा न आपला जीव गमावण्याची पाळी आली. या हृदयद्रावक घटनेने स्वतः ऑटोरिक्षा चालक असलेल्या मंजुनाथ पुजारी याला अंतर्बाह्य हेलावून सोडले. तेंव्हापासून त्याने ज्यांना तातडीची वैद्यकीय सेवा आवश्यक आहे अशा लोकांसाठी आपली ऑटोरिक्षा ॲम्बुलन्स म्हणून मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
दोन वर्षांपूर्वी मंजुनाथ नाही अनावधानाने जेंव्हा आपल्या या समाज कार्याची माहिती दिली. तेंव्हा पासून तो प्रसिद्धीच्या झोतात आला. जखमी अथवा आजारी लोकांच्या मदतीसाठी मंजुनाथ पुजारी नेहमी मी एका पायावर तयार असतो. आपण समाजाचे देणे लागतो असे मंजुनाथचे मत आहे. एखाद्या रुग्णाला काळजीपूर्वक वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोचवून त्याचे जीवन सुरक्षित करणं यात एक वेगळेच समाधान असते, असे मंजुनाथ पुजारी म्हणतो. मंजुनाथच्या या आगळ्यावेगळ्या समाज कार्याची दखल विविध संघटनांसह खुद्द पोलीस आयुक्तांनी देखील घेतली आहे. आता
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने आपल्या 2020 सालच्या नव्या सुधारित आवृत्ती मध्ये घेतली मंजुनाथ पुजारी यांच्या कार्याची दखल घेतली गेल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ऍम्ब्युलन्स ऑटोरिक्षा चालक मंजुनाथ निंगाप्पा पुजारी यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत- 9964375115, 9449014362.