बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात तीन वर्षाचा कार्यकाळ क्राईम डी सी पी म्हणून बजावलेले कर्तव्यदक्ष अधिकारी अमरनाथ रेड्डी यांची बेळगाव जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रेड्डी यांनी बेळगाव पोलीस आयुक्तालयात डीसीपी क्राईम म्हणून तीन वर्षे यशस्वीपणे कार्यकाल सांभाळला होता त्यानंतर त्यांची नियुक्ती बेळगावचे एसीबी डीएसपी म्हणून झाली होती. आता ते बेळगाव जिल्ह्याचे एडिशनल एस पी बनणार आहेत.
लवकरच रेड्डी बेळगाव जिल्ह्याचा एडिशनल एस पी प्रभार स्वीकारणार आहेत तर बेळगाव एसीबी एस पी पदी धारवाड चे बी एस न्यामगौडा यांची नियुक्ती झाली आहे.
बेळगावचे एडिशनल एस पी राम अरसिद्ध यांची विजापूर जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुख पदी नियुक्त झाली आहे
बेळगाव शहरात होणाऱ्या दंगलीवर नियंत्रण आणण्यासाठी डी सी पी अमरनाथ रेड्डी यांनी विशेष काम केले होते या शिवाय क्राईम डी सी पी असताना सुद्धा शहरातील कायदा सुव्यवस्थेवर चांगले नियंत्रण ठेवले होते आता ते जिल्ह्याचे एडिशनल एस पी बनणार आहेत उद्या पदभार स्वीकारणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.