बेळगाव तालुक्यातील मोदगा गावचे रहिवाशी म्हणून खोटे प्रमाणपत्र घेत कृषी पत्तीन बँकेत संचालक पद भूषवत असलेल्या ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या भाऊ चन्नराज हट्टीहोळी यांच्यावर जिल्हा प्रशासनाने क्रिमिनल केस घालून कारवाई करावी अशी मागणी भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष सिद्दगोंडा मोदगी यांनी केली आहे.
चन्नराज हट्टीहोळी हे खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी गावचे ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे ते लहान बंधू आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करून मोदगा ग्राम पंचायतीचे रहिवाशी म्हणून सर्टिफिकेट मिळवले आहे. आपली बहीण आमदार आहे. या अविर्भावात राहणाऱ्या भावाला आता चांगलाच चाप बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
कृषी पत्तीन सहकारी संघाला दिलेल्या प्रमाणपत्रावर ग्राम पंचायत सदस्य बाबू काळे यांनी सही केली आहे. तात्काळ कृषी पत्तीनं सहकारी संघाच्या सचिवांनी सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पंचायत सी ई ओ व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी द्वारा केली आहे.
चन्नराज यांनी खोटे प्रमाणपत्र जोडून 2019 च्या पी के पी एस निवडणूकीत संस्थेचे सदस्यपद मिळवलं आहे.
नकली प्रमाणपत्र जोडणे कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणी नियम व कायद्याचे उल्लंघन झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्या वर क्रिमिनल केस दाखल करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.