काँग्रेस हे राष्ट्रवीराना बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहे यामुळे हा क्रांतिवीर आणि राष्ट्रवीरांचा अवमान आहे. काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात ‘वीर सावरकर कितने वीर’ या नावाने पुस्तके वाटण्यात आली. त्या पुस्तकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात खोटारडे लिखाण करण्यात आले आहे असा आरोप हिंदू जनजागरण समितीने केला आहे.
काँग्रेस स्वातंत्र्यवीरांना बदनाम करण्यासाठी अत्यंत हीन पातळी गाठत आहे ज्यांनी हे पुस्तक लिहिल आहे त्या प्रकाशकावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी हिंदु जनजागरण समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनात करण्यात आली आहे .
कांग्रेसने जी पुस्तके वाटली आहेत त्यामळे धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे . काँग्रेसची शिबिरे म्हणजे देशातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे प्रशिक्षण केंद्र असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
या देशातील प्रतिकार म्हणजे प्रार्थना स्थळावर दगडफेक करणारे आणि अल्पसंख्याकाच्या महिलावर अन्याय करणारे असे दाखविण्यात आले आहे सावरकराच्या चारित्र्यावर शितोडे उडविणाऱ्याना व्यक्तीना कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे . असेही या निवेदनात म्हटले आहे . त्या पुस्तकावर बंदी घालावी तसेच त्या प्रकाशकावर कारवाई करावी . अन्यथा सामाजिक शांतता बिघडविल्यास त्याला काँग्रेसच जबाबदार असेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे . बेळगावचे शिरस्तेदार एम एम नदाफ याना निवेदन देण्यात आले यावेळी सुधीर हेरेकर , ऋषिकेश गुर्जर सदानंद मासेकर गोपाळ हलगेकर अर्चना किमये मिलन पवार याच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.