Thursday, December 26, 2024

/

सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी युवक अटकेत

 belgaum

सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी युवक अटकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा टिकटॅक व्हीडिओ तयार करून त्यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून संकेश्वर येथील एका व्यक्तीला संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.अटक केलेल्या व्यक्तीचे नाव अमन वाहिद आवटी रा.संकेश्वर असे आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे, व्हीडिओ याचा वापर करून त्याला गाण्याची जोड देऊन टिकटॅक व्हीडिओ तयार केला होता.व्हीडिओ तयार केल्यावर त्याने तो सोशल मीडियावर पसरवला होता.

नंतर या बदनामी करणाऱ्या व्हीडिओची चर्चा लोकांत होऊ लागली.नंतर याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी अमन वाहिद आवटी याला अटक केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.