कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 डिसेंबर रोजी दुपारी मंत्रालयात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्याचे मंत्री तसेच महाअधिवक्ता उपस्थित राहणार आहेत.
बेळगाव सीमाप्रश्नासाठी होणाऱ्या या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीला मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव अयोज मेहता तसेच महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह राज्याच्या विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ विधी सल्लागार उपस्थित राहणार आहेत.
बेळगाव मधून देखील या बैठकीसाठी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी,प्रकाश मरगाळे , शहर समितीचे किरण ठाकूर आदी जण उपस्थित राहणार आहेत.
उच्चाधिकार समितीची बैठक व्हावी यासाठी नवीन उच्चाधिकार समिती नियुक्त करावी या शिवाय दिल्लीतील सुप्रीम कोर्टाचे वकील आणि बेळगावातील विविध समस्यां सोडवण्यासाठी नवीन समन्वयक मंत्री नियुक्त करण्या बाबत तसेच दिल्लीतील जेष्ठ विधी तज्ञ व वकिलांचे पॅनेलची बैठक घेऊन लवकर सुनावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सीमा खटल्याला गती येण्यासाठी महाराष्ट्राच्या अडव्होकेट जरनल चा सहभाग दाव्याच्या कामकाजात सहभाग असावा अश्या मागण्या केल्या आहेत.