नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी कार्यभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री होताच त्यांनी विविध विषयावर ठोस निर्णय घेऊन अनेकांना दिलासा दिला आहे. याचबरोबर सीमाप्रश्नाबाबत ही गांभीर्याने विषय पटलावर घेत समन्वय समितीची बैठक घेतली आहे. त्यामुळे सीमा प्रश्न सोडवण्यासाठी आता गती मिळणार असून साऱ्यांच्यानजरा पुढील समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करण्यावर लागून राहिले आहे.
बेळगाव सीमा प्रश्न उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करा व समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करा अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र शासनाकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन बेळगाव वासियांना समाधान केले आहेत. नुकतीच राज्यपाल भगतसिंग यांनी अभिभाषणात बेळगावातील मराठी जनतेला न्याय मिळविणे यासाठी प्रयत्न करू असे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा सीमाभागातील जनतेला आशा पल्लवित झाल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक मोठे आणि ठोस निर्णय घेऊन साऱ्यांनाच दिलासा दिला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या कर्ज माफी कडे ही त्याने लक्ष घातले आहे. त्यामुळे आता बेळगाव सीमा प्रश्नाकडे ही त्यांनी लक्ष घातले असून तो सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत नवीन समन्वयक मंत्री नियुक्त करून दिल्लीतील जेष्ठ विधिज्ञ व वकिलांची बैठक घेऊन तातडीने सुनावणी होण्यासाठी प्रयत्न करण्याकडेही हे लक्ष देणार आहेत. सध्या नुकतीच एक त्यांनी बैठक घेतली असून या बैठकीत ठोस निर्णय घेतले आहेत.
बेळगाव येथील नेत्यांनी मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना देखील पत्रे पाठवली होती. याची दखल घेत त्यांनी बैठक घेतली असून सीमा भागातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सीमाप्रश्न तातडीने सोडावा या मागणीसाठी मागील 63 वर्षापासून सीमावासीय झटत आहेत. मात्र आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे झाल्यानंतर या प्रश्नाला बळकटी मिळत असून हा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.