वडगाव ग्रामीण पोलिसांनी दोन मोटरसायकल चोरांना अटक करून त्याच्याकडून दोन लाख सत्तर हजार किमतीच्या सात दुचाकी वाहने हस्तगत केली आहेत.
रविवारी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पी एस आय कृष्णवेणी गुर्लहोसूर या आपल्या सहकाऱ्यांसह वाहनांची तपासणी करत असताना तपासणीसाठी दुचाकी वाहन थांबवले.दुचाकीवरील दोघांकडे कागदपत्रांची मागणी केली असता कागदपत्रे त्याच्याकडे नसल्याचे लक्षात आले.
कोणतेही समर्पक उत्तर त्यांनी न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांना अधिक चौकशी साठी पोलीस स्थानकात नेले.तेथे कसून चौकशी केल्यावर शहर आणि परिसरात दुचाकी वाहने चोरल्याचे त्यांनी कबूल केले.एकूण सात चोरीची वाहने त्यांच्याकडून जप्त करण्यात आली.
पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे अहमद वलीसाब सनदी आणि फहिम सिकंदर करवेशकर रा आझादनगर अशी आहेत.ग्रामीण सिपीआय सुनीलकुमार नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.