केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने भुतारामहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा निसर्ग धाम येथे वाघ,सिंह, अस्वल, चित्ते कोल्हे यांच्यासह अन्य कांही अन्य वन्य प्राणी व पक्षी ठेवण्यास परवानगी दिली आहे.
भुताराम हट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा निसर्ग धाम येथे वाघ,सिंह आदी वन्य प्राणी आणि पक्षी ठेवण्यास परवानगी मिळावी यासाठी गेल्या 2018 सालापासून कर्नाटक राज्य प्राणिसंग्रहालय खाते प्रयत्नशील होते त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने भुतरामहटटी येथील राणी चन्नम्मा निसर्गधामामध्ये वाघ, सिंह, अस्वल आदी हिंस्त्र वन्य प्राणी तसेच पक्षी बाळगण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. राणी चन्नम्मा निसर्गधाम व्यवस्थापनाने सदर वन्यप्राणी बाळगण्यात विशेष रस दाखवल्याबद्दल कर्नाटक राज्य प्राणी संग्रहालय खात्याने धन्यवाद दिले आहेत. मैसूर आणि बननेरघट्ट अभयारण्यातुन दोन वाघ बेळगावला आणण्यात येणार आहेत.
राणी चन्नम्मा निसर्गधाम येथील व्याघ्र प्रकल्प उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. व्याघ्र निवासाची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. आता येत्या काही महिन्यांमध्ये म्हैसूर आणि बन्नेरघाट्टा प्राणीसंग्रालय येथून प्रत्येकी दोन असे एकूण 4 वाघ बेळगावातील प्राणी संग्रहालयामध्ये आणले जाणार आहेत.
राणी चन्नम्मा निसर्गाधामामध्ये व्याघ्र प्रकल्प आणि वन्यप्राण्यांची भर पडल्यास या निसर्गधामाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.