तातडीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव येत्या 14 ते 26 डिसेंबर 2019 या कालावधीत दररोज दोन तास शहरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.
बेळगाव शहराला वीजपुरवठा करणारे सर्व आठ फीडर्स 14 डिसेंबरपासून दररोज दोन तास बंद ठेवले जाणार आहेत. मात्र या वीज कपातीची निश्चित वेळ जाहीर करण्यात आलेले नाही.
दररोज दोन तास तसेच काहीवेळा त्याहूनही जास्त कालावधीसाठी शहरातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, असेही हेस्कॉमने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.