घटप्रभा आणि चिकोडी रोड रेल्वे स्थानकादरम्यान दुहेरी रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी बहुतांश गाड्या रद्द तर काही अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत, असे नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
दुहेरी रेल्वेमार्गासाठी नोन इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने घटप्रभा ते चिकोडी रोड रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची पैकी बहुतांश रद्द तर उर्वरित अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभाग व्यवस्थापकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार रद्द व अन्य मार्गाने वळविलेल्या रेल्वेगाड्यांची माहिती खालील प्रमाणे आहे.
*रद्द झालेल्या रेल्वेगाड्या*
11 डिसेंबर 2019 रोजी धावणारी रेल्वे क्रमांक 51461 / 51464 मिरज- बेळगाव -मिरज पॅसेंजर रेल्वे रद्द. रेल्वे क्रमांक 51431/ 51432 मिरज -लोंढा -मिरज पॅसेंजर रेल्वे रद्द. रेल्वे क्रमांक 51420/ 51419 हुबळी -मिरज -हुबळी पॅसेंजर रेल्वे रद्द. रेल्वे क्रमांक 51462 बेळगाव- मिरज पॅसेंजर रेल्वे रद्द. रेल्वे क्रमांक 51405 मिरज- कॅसलरॉक पॅसेंजर रेल्वे रद्द. 11 व 12 डिसेंबर रोजी धावणारी रेल्वे क्रमांक 51406 कॅसलरॉक- मिरज पॅसेंजर रेल्वे रद्द. रेल्वे क्रमांक 17317 हुबळी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस रेल्वे रद्द. रेल्वे क्रमांक 17318 लोकमान्य टिळक टर्मिनस -हुबळी एक्सप्रेस रद्द.
*अन्य मार्गाने वळविलेल्या रेल्वे गाड्या*
10 डिसेंबर रोजी धावणारी रेल्वे क्रमांक 11303 मनुगुरू- कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वे, बदललेला मार्ग गदग, होतगी, सोलापूर, पंढरपूर, मिरज. रेल्वे क्रमांक 11304 कोल्हापूर -मनुगुरू एक्सप्रेस रेल्वे, बदललेला मार्ग मिरज, पंढरपूर, सोलापूर, होतगी, गदग. रेल्वे क्रमांक 17415 तिरुपती- कोल्हापू एक्सप्रेस रेल्वे, बदललेला मार्ग गदग होतगी, सोलापूर, पंढरपूर, मिरज. 10 व 11 डिसेंबर रोजी धावणारी रेल्वे क्रमांक 17416 कोल्हापूर- तिरुपती एक्सप्रेस रेल्वे, बदललेला मार्ग मिरज, पंढरपूर, सोलापूर, होतगी, गदग.
तरी उपरोक्त रद्द आणि मार्ग बदललेल्या रेल्वे गाड्यांची नोंद घेऊन प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रल्वेच्या हुबळी विभाग व्यवस्थापकांनी केले आहे.