बंद घराचे कुलूप तोडून आनंदनगर येथे चोरट्यानी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लांबवले.आनंदनगर येथील पवार यांच्या घरात चोरट्यानी डल्ला मारला असून तीस हजार रुपये रोख आणि दहा ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवले.
पवार कुटुंबीय दहा डिसेंम्बर रोजी बंगलोरला गेले होते.तेरा तारखेला ते परत आल्यावर चोरीची घटना उघडकीस आली.या प्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घराला कुलूप लावलेले पाहून चोरटे बंद घरांना लक्ष करून चोऱ्या करत आहेत.