आनंदवाडी शहापूर येथील एका युवकाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री तिसऱया रेल्वे गेटजवळ घडली आहे. जीवनाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.लक्ष्मण वसंत सुराळकर (वय 38) असे त्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
तो उद्यमबाग येथील कारखान्यात जात होता. शनिवारी रात्री तिसऱया रेल्वेगेटजवळ त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नेंद झाली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मजगावजवळ आत्महत्या केलेल्या युवकाची पटली ओळख
शनिवारी मजगावजवळ एका अनोळखी युवकाने रेल्वे खाली आत्महत्या केली होती. शनिवारी रात्री सोशल मिडीयाने यासंबंधी वृत्त प्रसिद्ध केले होते. यातील फोटोवरून रात्रीच मृतदेहाची ओळख पटल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. अमित शट्टूप्पा कुंडेकर (वय 35 रा. पाटील गल्ली वडगाव) असे त्याचे नाव आहे.
आपल्या हातावर जयमहाराष्ट्र असे त्याने गोंदवून घेतले होते त्यामुळे देखील त्याची ओळख सापडली आहे .