सोमवारी रात्री दहाच्या सुमारास समाजकंटकांकडून पुन्हा धुडगूस करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दगडफेक झाल्याची घटनाही घडल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत त्यावर नियंत्रण मिळविले असून त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात ही दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे. समाजकंटकांकडून दगडफेक होतात पोलिसांनी परिसरातील व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करत दुकाने बंद करण्यास सांगितले. साडेनऊ नऊ ते दहा या दरम्यान ही दगडफेक झाली आहे. बसस्थानक आवारात ही दगडफेक झाल्याने पोलिसांनी तातडीने बंदोबस वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
मागील काही महिन्यापासून बेळगाव शांत होते. मात्र सोमवारी रात्री पुन्हा काही समाजकंटकांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुडगूस घालण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने समाजकंटकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचा शोध लागला नसल्याची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली होती. मात्र त्यावर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.
सोमवारी मतमोजणी सुरळीत पार पडल्यानंतर समाजकंटकांनी ही दगडफेक केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र बसस्थानक आवारात हा प्रकार घडल्याने पोलिसांनी खबरदारी घेतली. त्यामुळे त्याचे पडसाद सर्वत्र उमटले नाहीत. मात्र त्या समाजकंटकांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे. नेमके निवडणुकी च्या निकालानंतरच ही दगडफेक करण्यात आली आहे की त्याला आणखी काही कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.