Monday, January 27, 2025

/

सामाजिक कार्यकर्त्यांनी केले दागिने सुपूर्द

 belgaum

बेळगाव नार्वेकर गल्लीतील वृद्ध महिलेच्या निधनानंतर तिच्या पश्चयात असलेल्या संपत्तीचा तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या दहा तोळे सोने इतर रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली.याकामी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा केकरे यांनी घरमालक नातेवाईक पोलिसखाते यांच्याशी समन्वय साधून नातेवाईकांकडे सोने आणि रोख रक्कम सुपूर्द करण्यात बहुमोल कामगिरी बजावली.

अंजली बापूसाहेब मनसबदार (75) यांचे दिनांक 16 नोव्हेंबर रोजी निधन झाले होते त्यांच्या पश्चात कोणीही नसल्याने गल्लीतील नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्य संस्कार केले होते वृद्ध महिला भाडोत्री घरात रहात होती तीचे निधन झाल्यावर घराचा ताबा कुणाकडे द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी घर मालकांनी शिल्पा केंकरे यांना बोलावून जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत घराला कुलूप लाऊन त्याची शिल्पा यांच्या कडे सुपूर्द केली होती.

Shilpa kekre
Shilpa kekre

सगळे विधी आटोपल्या नंतर सामाजिक कार्यकर्ते घर मालक पंच मंडळीच्या उपस्थितत घर उघडून घरातील सामान तपासून पाहिलें असता बॅगेत दहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळली.दागिन्यांची सर्वांसमक्ष यादी वजन करून ते शिल्पा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले वृद्ध महिलेच्या कणबर्गी येथील नातेवाईक विजयकुमार अष्टेकर यांना पोलीस स्थानकात बोलावून शिल्पा यांच्या हस्ते त्यांच्या हाती दागिने सुपूर्द करण्यात आले.

 belgaum

यावेळी पोलीस निरीक्षक धीरज शिंदे,माजी महापौर विजय मोरे,अभिजित भातकांडे,विजय जाधव महेश रेवणकर आणि डी बी पाटील उपस्थित होते.मृत वृद्धेच्या नातेवाईकांचा शोध घेऊन या सामाजिक कार्यकर्त्यानी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.