तुझ्यात आहे हिम्मत तर घाल आम्हाला गोळ्या असे जाहीर आव्हान देत कोल्हापुरातील संतप्त शिवसैनिकांनी शनिवारी कर्नाटक नवनिर्माण सेनेचा म्होरक्या भीमाशंकर याच्या प्रतीकात्मक तिरडीचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर दहन केले.
कर्नाटक नवनिर्माण सेनेचा म्होरक्या भीमाशंकर पाटील याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर जाऊन गोळ्या घाला असे वादग्रस्त व्य व्यक्तव्य केले त्याची तीव्र पडसाद बेळगाव सीमा भागाप्रमाणेच महाराष्ट्रातही उमटत आहे भीमाशंकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आज शनिवारी सकाळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जाऊन आंदोलन केले याप्रसंगी शिवसैनिकांनी भीमाशंकर याची प्रतीकात्मक तिरडी बांधून अंत्ययात्रा काढली तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर त्या तिरडीचे तोंडाने शंख नाद करत दहन केले. या आंदोलनात कोल्हापूर शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
या आंदोलनानंतर शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. कर्नाटक नवनिर्माण सेनेचा स्वयंघोषित नेता भीमाशंकर पाटील यांने दोन दिवसापूर्वी म. ए. समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर नेऊन गोळ्या घातल्या पाहिजेत असे जे वक्तव्य केले त्याचा आम्ही निषेध करतो असे सांगून देवणे म्हणाले की, सीमा चळवळ गेल्या 50 वर्षापासून सुरू आहे. आजपर्यंत सीमाभागातील मराठी माणसाला त्रास देण्याचेच काम कन्नड धार्जिन सरकारने केले आहे.
सीमा लढ्यात म. ए. समिती आणि शिवसेनेचे 50 हून अधिक लोक हुतात्मे झाले आहेत. याची जाण नसलेल्या भीमाशंकर पाटील याने समिती नेत्यांबद्दल जे वक्तव्य केले त्याचा आम्ही निषेध करतो असे सांगून भीमाशंकर आता तुझी तिरडी घेऊन आम्ही कर्नाटकाच्या सीमेवर आलो आहोत. या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तुझी तिरडी जाळली आहे. तुझ्यात आहे हिम्मत तर घे बंदूक घाल आम्हाला गोळ्या असे आव्हानही शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी दिले.
वरील बातमीचा व्हीडिओ पहाण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
कनसे अध्यक्ष भीमा शंकर पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध-कोल्हापूर शिवसैनिकांनी केलं कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर आंदोलन#काय…
Posted by Belgaum Live on Friday, December 27, 2019