ग्रामीण मतदारसंघात मराठ्यांचे वर्चस्व आहे हे जाहीरपणे सांगणाऱ्या रमेश जारकीहोळी यांना विरोधाचा सामना करावा लागत आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना विरोध करण्यासाठी म्हणून त्यांनी ‘बेळगाव ग्रामीण मतदारसंघ मराठ्यांच्या हक्काचा मतदार संघ’ असे वक्तव्य केलं होतं .त्यावर मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी नाराजी व्यक्त केली होती आता मुख्यमंत्र्यां पाठोपाठ कन्नड रक्षण वेदिकेने देखील रमेश यांना टार्गेट केले आहे.
रमेश जारकीहोळी यांच वक्तव्य कन्नड रक्षण वेदिकेला देखील पचलेले दिसत नाही मंगळवारी कित्तुर राणी चन्नम्मा चौकात रमेश जारकीहोळी यांच्या प्रतिकृतीचे दहन करून आपला कंडू शमवून घेतला.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी कन्नड भाषिक आमदार असून देखील रमेश जारकीहोळी मराठा समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावं अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव घालू असा इशारा देखील एका कानडी संघटनेने दिला आहे.
ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यात जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. त्यात रमेश यांनी पोट निवडणूक जिंकताच आपण ग्रामीणसाठी कार्य करणार असल्याचे जाहीर करत लक्ष्मी यांच्या विरोधात जोरदार मोर्चा खोलला आहे.दररोज एकमेकां विरोधात त्यांची वक्तव्ये येत आहेत.
रमेश जारकीहोळी यांनी भाजप मधील मराठ्यांना एकत्र या, ग्रामीण मतदारसंघ हा मराठ्यांचा बालेकिल्ला आहे याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे .मात्र केवळ वक्तव्य केल्याने करवे असो मुख्यमंत्री असो त्यांनी रमेश यांना विरोध करायला सुरुवात केली आहे.मराठ्यांनी एकत्र येऊ नये का?रमेश जारकीहोळी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मराठा समाजाला आपल्या ताकदीची जाणीव झाली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.आगामी निवडणुकीसाठी मराठा समाजातील एक चांगला उमेदवार उभारल्यास त्याला निवडून येणे सहज शक्य आहे एव्हढे तरी मराठ्यांनी ध्यानात ठेवावे हीच अपेक्षा.