आमदार रमेश जारकीहोळी यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.गोकाकमध्ये मंगळवारी रमेश जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.मी स्वतः किंवा माझ्या मेहुण्याने गोकाक नगरपंचायतीत कोणताही भ्रष्टाचार केला नाही.
आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत.निवडणूक प्रचार काळात आमच्यावर केले गेलेले आरोप बिनबुडाचे आहेत.कोणीही माझ्यावरील आणि मेहुण्यांवरील आरोप सिद्ध करून दाखवावेत असे आव्हान जारकीहोळी यांनी दिले.
भ्रष्टाचार कोणी केलाय याची चौकशी करून भ्रष्टाचार केलेल्याला निश्चित शिक्षा दिली जाईल असेही जारकीहोळी म्हणाले.गेल्या दीड महिन्यापासून आम्ही निवडणुकीला उभारलेले आमदार एकमेकांना भेटलो नाही.त्यामुळे उद्या आम्ही सगळे जण बंगलोरमध्ये भेटणार आहे असे जारकीहोळी म्हणाले.