लक्ष्मी हेब्बाळकर या विष बाधित महिला(विष कन्या) आहेत त्या ज्या पक्षात जातात त्या पक्षाचं नुकसान होणारच काँग्रेसची अधोगती लक्ष्मी हेब्बाळकर मुळेच झाली आहे अशी जहरी टीका गोकाकचे नवनिर्वाचित आमदार रमेश जारकीहोळी यांनी केली आहे.सोमवारी आर पी डी कॉलेज मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत मतमोजणीत विजयी घोषित होताच त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया देत हेब्बाळकर यांना टार्गेट केले आहे.
गोकाकच्या जनतेचे आभार व्यक्त करताना त्यांनी रमेश जारकीहोळी यांना अपात्र घोषित केलेले तात्कालीन स्पीकर रमेश कुमार यांच्यावर देखील टीका करत हा निकाल त्यांच्या कानशिलात लगावल्या सारखा आहे असं त्यांनी म्हटलं आहे.हा विजय कायदेशीर विजय असून अमित शाह आणि बी एस येडीयुरप्पा यांचा विजय आहे असेही म्हणायला ते विसरले नाहीत.
सिद्धारामया आजही आमचे नेतेच आहेत चांगल्या पद्धतीने निवडणूक केल्या बद्दल मी भाऊ सतीश यांचे अभिनंदन करतो आज पासून नवीन अध्याय सुरू झाला असून लखन माझा लहान भाऊ आहे असे म्हणत त्यांनी निवडणूकित झालेल्या आरोप प्रत्यारोपा नंतर सतीश व लखन यांच्या बद्दल सहानुभूती दाखवली आहे.
आर पी डी कॉलेज मध्ये मतमोजणी सुरू असताना रमेश जारकीहोळी यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. निकडणुकीत झालेल्या आरोप प्रत्यारोपां नंतर निकाला नंतर एकीकडे त्यांनी भाऊ सतीश व लखन यांच्याबाबत सहानुभूती तर ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या जोरदार टीकास्त्र करत हल्ला चढवला आहे त्यामुळे भविष्यात ग्रामीण लक्ष्मी विरुद्ध रमेश द्वंद्व रंगणार हे नक्कीच…