Thursday, November 21, 2024

/

कांद्यामुळे झाला वांदा…

 belgaum

कांद्यामुळे खिशाला तर चाट बसतच आहे पण कांद्यामुळे आता मारामाऱ्या देखील होऊ लागल्या आहेत.यामुळे कांद्याने केला वांदा म्हणायची वेळ आले हेच खरे.नेहरूनगर मधील सुखासगर बिल्डिंगमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये कांदा मागितला म्हणून चक्क काट्या चमच्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

बुधवारी दोन तरुण बिर्याणी खाण्यास गेले होते.त्यावेळी त्यांनी वेटरकडे कांद्याची मागणी केली.कांदा महाग झाल्यामुळे कांदा मिळणार नाही असे वेटरने सांगितल्यावर दोन तरुणांनी त्यांच्याशी हुज्जत घातली.

Onion
Onion कांदा

त्यामुळे राग अनावर झालेल्या दोघा हॉटेल कामगारांनी त्या दोन तरुणावर काट्या चमच्याने हल्ला केला.यामध्ये हे दोन तरुण जखमी झाले.नंतर त्यांच्यावर सिव्हीलमध्ये उपचार करण्यात आले.

किरण आणि अंकुश अशी जखमी तरुणांची नावे असून या बाबत अद्याप पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही असे पोलिसांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.