कंग्राळी खुर्द येथे एका मद्य धुंद अवस्थेत असलेल्या युवकाचा दगडावर पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज काहींनी वर्तविला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी हा खून नसून मद्यधुंद अवस्थेत दगडावर पडून मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
दत्ता सुनील दावतार वय 40 राहणार कंग्राळी खुर्द असे त्या या युवकाचे नाव आहे. सोमवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत तो कंग्राळी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या एका शेडमध्ये तो बसण्यासाठी गेला होता. मात्र तोल जाऊन तो एका दगडावर आपटला त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला आहे रात्रभर त्याचा मृतदेह तिथे पडल्यावर कुत्र्यांनी चेहऱ्याचे लचके मारल्याने ओळख सापडत नव्हती.तो ड्रायव्हरचे काम करत होता दारू सेवन अधिक करत होता अशी देखील माहिती उपलब्ध झाली आहे.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास काही नागरिकांनी त्याचा मृतदेह पाहिला व हा खून झाल्याचे गावात वार्ता पसरली. तातडीने एपीएमसीच्या पोलीस स्थानकात संपर्क साधून याची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवगृहात हलविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून दत्ता यांना दारूचे व्यसन जडले होते. सोमवारी रात्री ही मद्यधुंद अवस्थेत घरी परतत असताना आसरा शोधण्यासाठी बस स्थानका जवळ गेला. तेथे तोल जाऊन त्यांचे डोके दगडावर आपटले व तेथेच कोसळला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला असून त्यानंतर काही भटक्या कुत्र्यांनी त्यांच्या या शरीराचे लचके तोडल्याची ही यावेळी पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे मात्र परिसरात एकच खळबळ माजली असून हा घातपात आहे की आणखी काही आता संशय व्यक्त करण्यात येत होता.