बेळगावचे आमदार अॅड. अनिल बेनके यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेऊन बेळगाव उत्तर मतदार संघाच्या विकासासंदर्भात चर्चा केली.
बेंगलोर मुक्कामी आमदार अनिल बेनके यांनी विकास कामांबाबत चर्चा करण्याबरोबरच मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना दुसरी राजधानी असलेल्या बेळगावसाठी अतिरिक्त निधी मंजूर करावा अशा आशयाचे निवेदनही सादर केले.
निवेदनाचा स्वीकार करून मुख्यमंत्र्यांनी आमदार उमेश कत्ती यांच्या उपस्थितीत बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच आपण अतिरिक्त निधी मंजूर करू असे आश्वासन दिले आहे.
डिसेंबर नंतर बेळगाव उत्तर मतदारसंघात मी विशेष लक्ष घालणार असून विशेष निधी देतो असे आश्वासन त्यांनी आमदार अनिल बेनके यांना दिले