कडोली येथील सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस गुरुवारी न्यायालयात हजर करून घेऊन जाताना संतप्त युवकांनी आरोपींवर हल्ला हल्ला केल्याने काही काळ एकच धावपळ उडाली.
दरम्यान सदर हल्ला प्रकरणी अटक केलेल्या युवकांची तरी सुटका करावी यासाठी न्यायालयानजीक रास्ता रोको करण्यात आला बेळगाव तालुक्यातील कडोली येथील सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले न्यायालयीन सुनावणीनंतर संबंधित आरोपीला पोलीस बंदोबस्तात घेऊन जात असताना न्यायालय आवारात उभ्या असलेल्या संतप्त जमावाने पोलिसांशी बाचाबाची केली तसेच आरोपीवर हल्ला चढविला त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखून पोलीस वाहनातून आरोपीला घटनास्थळावरून सुसाट वेगाने हिंडलगा कारागृहाकडे हलविले. दरम्यान न्यायालय आवारातील पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणताना चार तरुणांना ताब्यात घेतले .

पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेताच अजान बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शासन मिळावे यासाठी आवाज उठविला तर बिघडले कुठे? असा जाब विचारत न्यायालय आवारातील संतप्त जमावाने त्यानंतर रास्ता रोको आंदोलन छेडले तसेच संबंधित तरुणाची त्वरित सुटका करेपर्यंत करावी अन्यथा रस्ता रोको सुरूच ठेवला जाईल असा इशारा दिला. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जवळपास पंधरा- वीस मिनिटात हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि कार्यकर्ते देखील रस्तारोकोमध्ये सहभागी झाले होते.
आरोपींवरील हल्ल्याप्रकरणी काकती पोलिसांनी ज्या चार तरुणांना अटक केली आहे त्यांची त्वरित सुटका करावी. तसेच कडोली येथील सात वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या सुनील बाळ नाईक (वय 27) या नराधमाला भर चौकात गोळ्या घालून पोलीसांनी त्याचा एन्काऊंटर करावा, अशी मागणी रमाकांत कोंडुसकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
दरम्यान कडोली येथे आज गुरुवारी सायंकाळी बैठक बोलावण्यात आली असून आहे. या बैठकीत गावात यापुढे बेकायदेशीर अथवा अत्याचाराचे प्रकार घडू नयेत याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
व्हीडिओ पहा—
कडोली येथील सहा वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस कोर्टात हजर करताना संतप्त युवकांनी आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस व युवकांच्यात उडालेला गोंधळ पहा खालील व्हीडिओत