Wednesday, December 25, 2024

/

हिंडलग्यातील कैदी करणार ध्यान धारणा

 belgaum

जेलमधील कैद्यांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडावे आणि त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण व्हावा यासाठी गौतम बुद्धांच्या विपश्यना शिकवणीचा प्रयोग हिंडलगा जेलमध्ये केला जाणार आहे.हिंडलगा जेलचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी दिली आहे.

माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी यापूर्वी जेलमधील कैद्यांसाठी विपश्यना ध्यान धारणेचा प्रयोग राबवला होता.त्यामुळे जेलमधील कैद्यांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला.त्यांचे जीवन बदल बदलून गेले.किरण बेदी यांच्यापासून कृष्णकुमार यांनी प्रेरणा घेऊन यापूर्वी गुलबर्गा येथील जेलमध्ये विपश्यनेचा प्रयोग राबवला आहे.

HIndlga jail
Belgaum hindlga jail

हिंडलगा जेलमध्ये विपश्यना केंद्र सुरू करण्यासाठी हॉल तयार आहे.गौतम बुद्धांची चार फुटांची मूर्ती देखील एका व्यक्तीने भेट दिली आहे.विपश्यना केंद्रात शिकवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे.

विपश्यनेचे प्रशिक्षण घेतल्यावर कैद्यांच्या मनात सकारात्मक बदल निर्माण होईल,त्यांची विचार करण्याची पद्धत बदलून मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल.जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळून मन एकाग्र होण्यास मदत होईल असे कृष्णकुमार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.