ज्या काळात आम्ही शेअर्स केले होते, त्या काळात त्या रकमेची जागा घेऊन ठेवली असती तर लाखोंचे मालक झालो असतो, मात्र आपल्या हक्काचा एक साखर कारखाना असावा असे म्हणत गेले कित्येक वर्षे आणि वाट पाहिली.
ही भावना व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू बेळगाव live ने प्रकर्षाने मांडली.
टिका केली आणि दरवर्षी साखर कारखाना सुरू करतो असे स्वप्न दाखवणाऱ्यांना झोडपलेही. अनेकांचे स्वप्न ठरलेल्या मार्कंडेय साखर कारखान्याची सुरुवात व्हावी, तेथे गाळप व्हावे आणि भ्रष्टाचारी मंडळींनी आपला भ्रष्टाचार थांबवून शेतकऱ्यांच्या उसाला न्याय द्यावा. हीच अपेक्षा होती.
आता ही अपेक्षा पूर्ण झाली असून यंदाच्या हंगामात साखर कारखान्यात गाळप सुरू झाले आहे. त्याबद्दलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि मार्कंडेय साखर कारखान्याच्या सुरू होण्याबद्दल शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. आता त्यांची एकच अपेक्षा आहे, की सातत्य राखले जावे. स्थानिक भूमिपुत्रांच्या उसाला वाव मिळावा.
ऊस खरेदी झाल्यानंतर त्याचे गाळप होऊन साखर बनवावी आणि प्रत्येकाला चांगला दर मिळावा, वेळेत बिले मिळावीत, या अपेक्षा विद्यमान संचालक मंडळ पूर्ण करेल आणि शेतकऱ्यांच्या योगदानाला किंमत देईल हीच अपेक्षा……….!