मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होऊन केवळ आठच दिवसात बेळगाव सीमा प्रश्नी आढावा बैठक घेत आपण आक्रमक आहे हे दाखवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समिती नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या केल्या आहेत.
आगामी पंधरा दिवसात समिती नेत्यांनी गट तट मतभेद विसरून एकीने काम करा अन्यथा बेळगावातल्या सामान्य युवकांना नेतृत्व देऊ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
बैठकीत मध्यवर्ती समितीच्या दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली पाच नेते,शहर समितीचे किरण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर समितीचे तर शिवसेनेचे पाच जण असे तीन गटात बैठकीस हजर होते. सुरुवातीला मंत्री जयंत पाटील यांनी एक व्हा आणि काम करा अश्या सूचना मांडल्या समितीच्या काही नेत्यांनी चुका झालेत त्यांच्यवर कारवाई करा अशी मागणी केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी मागील विसरून सर्वजण एकीने काम करा अश्या सूचना केल्या.
गेल्या काही वर्षात समिती नेत्यांत झालेल्या बेकीने लढा देखील कमकुवत झाला होता विधानसभेत देखील दारुण पराभव पत्करावा लागला होता.
महाविकास आघाडीच्या सहा मंत्र्यांनी शपथघेतली मात्र त्यांचे अद्याप खाते वाटप झाले नव्हते मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आता एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ या दोघाना बेळगाव सीमा भाग समन्वयक मंत्री नियुक्त करून खाते वाटप बेळगाव पासून सुरू केलं आहे.त्यातच दुही असलेल्या समिती नेत्यांच्या देखील कानपिचक्या केल्या आहेत त्यामुळे समितीचे तिन्ही गट एक येणार का हा प्रश्न आहे. बेळगाव लढ्याला बळकटी मिळण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समिती नेत्यांत एकी करण्याचे योग्य पाऊल उचलले आहे अश्या भावना व्यक्त होत आहेत.