सीमा भागातील मराठी साहित्य संमेलन लोकवर्गणीतून यशस्वीरीत्या भरवली जात आहे मराठी भाषा आणि संस्कृती टिकविणाऱ्या या संमेलनाना महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
समितीचे युवा कार्यकर्ते सूरज कणबरकर यांनी ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे या अगोदर देखील अनेकांनी पत्रे लिहीत निवेदने देत ही मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली होती या अनेक संमेलनात महाराष्ट्र सरकारने मदत करावी असा ठराव देखील केला आहे.
उध्दवजी आपणांस माझा बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राचा-जय महाराष्ट्र! कर्नाटक व्यप्त महाराष्ट्र म्हणजे आमचे बेळगाव. या ठिकाणी गेल्या कीतेक शतकांपासून मराठी भाषा, सांस्कृती व स्वाभिमान टिकविण्यासाठी अनेक मराठी उपक्रम प्रामाणिकपणे राबविले जातात. त्याचा मूळ पाया म्हणजे बेळगावसह समस्त सीमाभागात घेतली जाणारी साहित्य समेलने, ही समेलने घेण्यासाठी या आधी महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनूदान दिले जात होते. पण गेल्याकाही वर्षापासून ते अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे आम्ही आपणांस विनंती करतो की पुन्हा ते अनुदान सीमाभागात घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमास आपण द्यावे व मराठी संकृती,भाषा टिकविण्यासाठी बळ द्यावे. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगाव प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे.त्यातच आगामी अर्थ संकल्पात बेळगावातील मराठी संस्थांना आर्थिक मदतीची तरतूद होऊ शकते.मागील भाजप कार्यकाळात ही मदत बंद झाली होती आता महा विकास आघाडी बेळगावसाठी विशेष निधीची घोषणा करू शकते.