खानापूर तालुक्यातील नंदगड ग्राम पंचायतीने मिशन अंत्योदय 2019 सर्वेक्षणात संपूर्ण देशात पाचवा क्रमांक मिळवला आहे.नंदगड ग्राम पंचायतीला सर्वेक्षणात शंभरपैकी 86 गुण मिळाले आहेत.
तामिळनाडू राज्यातील मौलूगंबुंडी ग्राम पंचायतीने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.भांभानिया या गुजरात मधील ग्राम पंचायतीने दुसरा क्रमांक मिळवला आहे.
संपूर्ण देशातील ग्राम पंचायतीचे मिशन अंत्योदय योजनेत सर्वेक्षण करण्यात आले.तज्ज्ञांच्या तुकडीने ग्राम पंचायतीला भेट देऊन सर्वेक्षण केले आहे.ग्राम पंचायतीने राबवलेल्या विविध योजना,सरकारी योजनांची अंमलबजावणी ,ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या पायाभूत सुविधा ,स्वच्छता ,गावाची रचना आदी बाबींचा अभ्यास सर्वेक्षणात करण्यात आला आहे.
या अगोदर कचरा मुक्त नंदगड गाव बनवण्यासाठी गावात असलेल्या सर्व कचऱ्याची उचल करून तो एकत्रित करून वेगवेगळा केला गेला होता कचरा गोळा करून साठवण्यासाठी ग्राम पंचायतीने ए पी एम सी मध्ये जागा केली होती कचरा साठवून स्वच्छ नंदगड करण्यासाठी प्रयत्न ग्राम पंचायतीने चालवले होते त्याला यश मिळाले आहे.