बेळगाव हिंडाल्को फॅक्टरीचे रासायन मिश्रीत पाणी शिवारात शिरत आहे त्यामुळे शेत जमीनील खराब झाली आहे याचबरोबर पिकेही खराब झाली आहेत.तेंव्हा काकती परिसरातील शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी , अशी मागणी काकती परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे .
हिंडाल्को कारखान्यातील रासायनिक पाणी बऱ्याच वर्षांपासून शिवारात शिरत आहे . त्यामुळे जमीनीमध्ये पिक येणे कठीण झाले आहे .अनेक शेतकरी आणि त्यांच्या मुलांचा संसार या शेतीवरच अवलंबून आहे . मात्र या कारखान्यामुळे या परिसरातील शेती पूर्णपणे खराब झाल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे .
याबाबत कारखान्याच्या अधिकाऱ्यांना सांगण्यासाठी शेतकरी गेले असता संबंधित अधिकारी शेतकऱ्यांबरोबर अरेरावीची भाषा करत आहेत तेंव्हा त्या अधिकाऱ्याला योग्य ती समज द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .
कारखान्यातील रासायनिक पाणी व इतर घटक मिश्रीत होऊन जमीनीवर जवळपास सहा ते सात इंचचा थर पसरला आहे . त्यामुळे पिके येणे कठीण झाले आहे . याबाबत अनेकवेळा सबंधित अधिकाऱ्यांना सुचना करण्यात आल्या आहेत तरी देखील पाणी शिवारात सोडले जात आहेत संबंधित कारखान्यावर कठोरात कठोर कारवाई करावी , अशी मागणी या निवेदनात करण्यात आली .
शिरस्तेदार एम एम नदाफ याना निवेदन देण्यात आले . यावेळी महेश दगी सनील मोळेराखी मोहन कंग्राळकर भीमा ठुमरी,सिद्राय कोळी पंडलिक मरी केदारी हलगेकर बाळाराम याच्यासह शेतकरी उपस्थित होते.