Friday, December 20, 2024

/

कडोली बलात्कार-आरोपीचा वडील गजाआड

 belgaum

कडोलीतील मुलीच्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी सोमवारी संशयित आरोपीचे वडील बाळू भैरू बाळनाईक याला पोलिसांनी अटक केली आहे.एपीएमसी सीपीआय जावेद मुशापुरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जाळे विणून बाळूला अटक केली आहे.

अत्याचारग्रस्त मुलीला मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपुर्वी आरोपीच्या आईला अटक केली होती आज सोमवारी वडिलांना देखील अटक झाली आहर.या प्रकरणी आरोपी आणि त्याचे आई वडील अशा तिघांना अटक झाली आहे.

Apmc javed
Apmc police arrested kadoli suspect father

हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलीचे अपहरण करून तिला काकती येथील सर्व्हिस रोडवर तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करून बाळू फरारी झाला होता.त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते.पोलिसांनी कडोली प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास चालवला आहे.

रविवारी महिला बाल कल्याण मंत्री शशिकला जोलले यांनी कडोलीला भेट देत पोलिसांना तपास निःपक्षपाती पणे करण्याचे आदेश बजावले होते त्या अगोदर कडोली ग्रामस्थ व विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले होते त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.