Wednesday, December 25, 2024

/

जम्मूच्या सायकलिंगपटूचे बेळगावात स्वागत

 belgaum

‘भविष्य उज्ज्वल बनविणारे शिक्षण हा आमचा हक्क आहे’ हा संदेश देशभर पसरवण्यासाठी जम्मू येथून काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग मोहिमेवर निघालेल्या एसपीएन दोशी महिला महाविद्यालयाच्या 21 विद्यार्थिनींचे शुक्रवारी बेळगावात स्वागत करण्यात आले.

Jammu cycle players belgaum
Jammu cycle players belgaum

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (एचपीसीएल) पुरस्कृत केलेल्या या साहसी सायकलिंग मोहिमेतील विद्यार्थिनींचे एचपीसीएलचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक बिपलोब कुमार मंडल यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी एचपीसीएलचे सीनियर एएसएम अभिजित राऊत आणि वितरक मंडळींसह तेजस्विनी ईएनटी तसेच निर्मल गॅसचे सदस्य उपस्थित होते.

सदर स्वागत समारंभाचे औचित्य साधून एचपीसीएल- एलपीजी वितरकांतर्फे एलपीजी पंचायत- सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.