कडोली येथे सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर संपूर्ण तालुक्यातून व जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. ही घटना गंभीर असून त्याचे पडसाद सर्वत्र उमटत असल्याचे दिसून येत आहे. या सार्या प्रकारात न्यायालयात संशयित आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पोलिसांनी आता कडोली येथील नराधमाच्या घरासमोर ही पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
लक्ष्मी गल्ली कडोली येथील सुनील बाळू बाळनाईक याने सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना बुधवारी घडली. त्यानंतर ही वार्ता परिसरात पसरता एकच खळबळ माजली असून संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून त्याला जमावाच्या ताब्यात द्या अशी मागणी होत आहे.
न्यायालय आवारात गुरुवारी नराधमावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो बचावला असला तरी पोलिसांनी त्याला संरक्षण देऊन त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात केली आहे. त्यानंतर कडोली येथेही संताप व्यक्त होत असून गुरुवारी सायंकाळी झालेल्या बैठकीनंतर नागरिकांचा रोष पाहून नराधमाच्या घरासमोर ही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे. त्याने केलेली कृत्य हे लांच्छनास्पद असून त्यासाठी आता जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रकरणावरून कडोली येथील नराधमाच्या कुटुंबियांनाही धोका होऊ शकतो याची जाणीव होऊन पोलिस आणि त्यांच्या घरासमोरील कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.