कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नेत्यांनी सीमाभागातील नेत्याना गोळ्या घालू असे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. यावर युवा नेते आणि इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांनी वेळ आणि जागा सांगा आम्ही त्या ठिकाणी येऊ असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता या वक्तव्यावर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे पूर्ण सीमाभाग संतापून उठला आहे.
कर्नाटक रक्षण वेदिकेचा म्होरक्या भीमाशंकर पाटील याने सीमाभागातील नेत्यांना गोळ्या घाला असे बेताल वक्तव्य केले आहे. त्यामुळे संपूर्ण सीमाभागात एकच खळबळ माजली असून संबंधितांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. मात्र महाराष्ट्रातील खासदार आमदार आणि शिवसेनेच्या सैनिकांनी याला सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्नाटक रक्षण वेदिकेच्या उचापतीला आता चांगला जरब बसणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे सीमाभागातील नेते त्याच्या वक्तव्याला विरोध करत असून प्रशासनाला निवेदन देण्याच्या तयारीत आहेत.
इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांनी तर वेळ आणि जागा सांगा आम्ही त्याठिकाणी येऊन त्यांच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसे, असे सांगून त्यांच्यावर पलटवार केला आहे. यापुढे जर सीमा भागातील नागरिकांच्या केसालाही धक्का लागल्यास त्याची खैर नाही असे सांगून बेळगाव घुसून मारू असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे भीमाशंकरच्या मुसक्या आवळण्यासाठी आता प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र दुसरीकडे सीमाभागातुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भीमाशंकर पाटील याने केलेले वक्तव्य म्हणजे कानडी करणाचा सुरू असलेला मराठी वरील अन्याय असाच होतो. मागील 63 वर्षापासून सीमाभागातील मराठी जनता कर्नाटकी अत्याचाराला अक्षरशः वैतागले आहेत. तरीदेखील महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारला याची कोणतीच धग नसल्याचे दिसून येत आहे. मात्र येथील मराठी माणूस मागील अनेक वर्षांपासून कर्नाटकाचा अत्याचार सहन करत आला आहे. आता मात्र हा त्याच्या सीमाभागातील नेत्यांना गोळी घालण्यापर्यंत गेला आहे. त्यामुळे यापुढे तरी महाराष्ट्र शासनाने सीमा भागातील बांधवांचा पाठिंबा देऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.