फेसबूक फ्रेंडस् सर्कलतर्फे हिंदनगर येथील विनूग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णाला त्याच्या उपचारासाठी 8500 रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
औदुंबर चंद्रकांत तेंडुलकर असे संबंधित रुग्णाचे नाव आहे.
आईचा एकुलता एक मुलगा असणाऱ्या औदुंबरची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे फेसबुक फ्रेंडस् सर्कलतर्फे ही आर्थिक मदत करण्यात आली. या एकूण आर्थिक मदतीपैकी 7 हजार रुपये उपचाराच्या खर्चा दाखल हॉस्पिटल मध्ये भरण्यात आले तर उर्वरित 1500 रुपये रोख औदुंबरची आई रोहिणी तेंडुलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. गेल्या 1 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई येथे रस्ते अपघातात औदुंबर गंभीर जखमी झाला होता.
मुंबई येथे उपचारानंतर त्याला बेळगावच्या विनू ग्राम इस्पितळांमध्ये 12 सप्टेंबर 2019 रोजी दाखल करण्यात आले आहे. तेव्हापासून सदर तो अंथरूणाला खिळून आहे. एकुलता एक मुलगा असल्याने आणि घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे औदुंबरची आई रोहिणी यांना उपचाराचा खर्च भागविताना नाकीनऊ येत आहेत. जखमी औदुंबरला अन्य कोणी नातेवाईकही नाहीत.
तेंडुलकर मायलेकांची ही असहाय्य अवस्था पाहून फेसबुक फ्रेंडस् सर्कलने पुढाकार घेऊन त्यांना 8500 रुपयांची आर्थिक मदत देऊ केली. याप्रसंगी फेसबुक फ्रेंडस् सर्कलचे संतोष दरेकर, भरत राठोड, शेरसिंग चौहान, वरूण कारखानीस, अभिषेक बूचडी, अजित कुलकर्णी, समीर कुलकर्णी, कादिम बेपारी, शहाबुद्दीन बॉम्बेवाले, भर्मा कोलेकर, ओमकार अणवेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान औदुंबर तेंडुलकर यांचे अद्यापिही 96 हजार 473 रुपये इतके हॉस्पिटलचे बील भरावयाचे आहे तरी दानशूर व्यक्तींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि संस्थांनी त्याला आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन फेसबूक फ्रेंडस् सर्कलने केले आहे इच्छुकांनी मदतीसाठी 0831-2413333 किंवा 7026723434 या क्रमांकावर रुग्णाची आई रोहीणी तेंडुलकर यांच्याशी संपर्क साधावा.