शहरातील हिंदू नगर येथील विनू ग्राम इस्पितळांमध्ये उपचार सुरू असलेल्या औदुंबर चंद्रकांत तेंडुलकर या गरीब रुग्णाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रोहिणी तेंडुलकर यांचा एकुलता एक मुलगा असणारा औदुंबर गेल्या 1 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई येथे अपघातात जखमी झाला होता. मुंबई येथे उपचारानंतर त्याच्यावर आता बेळगावात उपचार सुरु आहेत.
रोहिणी तेंडुलकरांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आपल्या एकुलत्या एक मुलावरील उपचाराचा खर्च पेलणे त्यांना अवघड जात आहे. रोहिणी यांना इतर कोणी नातेवाईकही नाहीत. त्यामुळे त्यांना एकटीनाच मुलाच्या शुश्रूषेसाठी कायम इस्पितळात राहावे लागते.
तरी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि दानशूर व्यक्तींनी रोहिणी तेंडुलकर यांची भेट घेऊन त्यांना आर्थिक तसेच अन्य आवश्यक मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क रोहिणी तेंडुलकर: 0831-2413333, 7026723434.