बेळगावातील 110 के व्ही स्टेशन मध्ये अचानक बिघाड आल्याने दुपारी अडीच वाजल्यापासून बेळगाव शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे.एम के हुबळी उपकेंद्रातून मच्छे उप केंद्रात सप्लाय केला जाणारा पुरवठा बंद झाला आहे या दुरुस्तीसाठी तीन ते चार तासांचा अवधी लागणार अशी माहिती मिळाली होती चार तास उलटले तरी अध्याप विद्युत पुरवठा पुरवत झाला नाही अध्याप अजून किती वेळ दुरुस्तीसाठी लागणार याची माहिती नाही.
कॉलेज रोडला एकेरी वाहतूक मुळे व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे त्याच बरोबर दुपारी दोन वाजल्यापासून लाईट नाही व्यापाराने करायचं तरी काय फक्त 28 टक्के टॅक्स गोळा करून सरकारला भरायचा काय? असा संतप्त प्रश्न व्यापारी विचारत आहेत.
हेस्कॉम अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन विद्युत पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी केली जात आहे.