चोर्ला मार्गे बेळगाव हुन गोव्याला होणाऱ्या वाहतुकीवरील प्रवेश बंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. आता येत्या 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2020 पर्यंत या मार्गावरून अवजड वाहनांना गोव्यात वाहतूक प्रवेश बंदी असणार आहे. गोवा सरकारने एका आदेशाद्वारे ही बंदी जाहीर केली आहे.
उपरोक्त चार महिन्यांच्या कालावधीत सर्वसामान्य वाहनांसह मोठी व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही चोर्ला मार्गे गोव्यात प्रवेश बंदी असणार आहे. उत्तर गोव्याचे जिल्हा दंडाधिकारी आर. मेनका यांनी हा आदेश काढला आहे. प्रवेश बंदी असणारे मार्ग खालील प्रमाणे आहेत.
दत्तवाडी साखळी जंक्शन ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंतचा चोर्ला घाटातील गोवा- बेळगाव राज्य महामार्ग क्रमांक 1. (पीएचसी) साखळी जंक्शनपासून चोर्ला घाटातील राज्य महामार्ग क्रमांक 1 वरील गोव्याच्या सीमेपर्यंतचा मार्ग. होंडा जंक्शनपासून गोवा राज्यच्या सीमेपर्यंतचा चोर्ला घाटातील राज्य महामार्ग क्रमांक 1. तरी या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या वाहनचालकांनी या प्रवेश बंदीची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.