गॅस गळतीमुळे सिलेंडर स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन घरांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.रविवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान लक्ष्मी गल्ली हलगा येथे ही घटना घडली आहे.
या घटनेत शांतीनाथ चिक्कपराप्प, जिनाप्पा चिककपरप्पा आणि सुनील चिक्कपरप्पा यांची घरे आगीत जळली आहेत.

अशी झाली घटना
रविवारी सकाळी शांतीनाथ चिक्कपरप्पा यांच्या घरी कुणीही नव्हते मळणी असल्याने सर्व मंडळी शेताला गेलो होती केवळ सुजाता नावाची त्यांची मुलगी घरी होती.गॅस स्वंयपाक शेगडी पेटवून ती परसात काम करत होती अचानक आग लागल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड केली तेवढ्यात आगीने पेट घेत सिलेंडर स्फोट घेतला त्या नंतर आगीने रौद्ररूप धारण करत बाजूच्या घरांना देखील पेट घेतला. स्फोट झाला त्यावेळी घरी कुणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली आहे.
घटनास्थळी लागलीच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले दोन गाड्यांनी आग विझवे पर्यंत तिन्ही घरातील सामान जळून खाक झाले होते.आग लागताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी करत आग विझवण्याचा प्रयत्न केला.बागेवाडी पोलिसांनी देखील भेट देऊन पंचनामा केला आहे.
तिन्ही घरांत मिळून नेमकं किती समान आगीत जळून खाक झालं याची माहिती पोलिसांचा पंचनामा झाल्यावर कळणार आहे मात्र हे नुकसान लाखोंच्या घरात आहे अशी माहिती आहे.