बेळगाव शहरासह मारिहाळ पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी घरफोड्या करून चोऱ्या करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पकडण्यात मारिहाळ पोलिस यशस्वी झाले आहेत. एक रिक्षा, पाच दुचाकी वाहने, 168 ग्राम सोन्याच्या दागिन्यासह एकूण 9 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
रामप्पा हालप्पा कुरिहाळ वय 20 रा.मूळ चंदूर सध्या रा.वाल्मिकीनगर ,उद्यमबाग,बसप्पा हालप्पा कुरीहाळ वय 21 रा मूळ चंदूर सध्या रा.वाल्मिकीनगर,संतोष मनोहर कांबळे मूळचा हुक्केरी सध्या रा.जैतूनमाळ चननमा नगर बेळगाव,सुनील बसप्पा तोटगी वय 28 मुळचा हुदली सध्या रा.राणी चननम्मा नगर बेळगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
8 डिसेंम्बर रोजी गोकाक रोडवर कबलापूर येथे घरात चोरी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यानी लांबवल्याची तक्रार केल्याची तक्रार मंजुनाथस्वामी देवागीमठ यांनी केली होती. मारिहाळ पोलीस निरीक्षक विजय शिन्नुर यांनी या चोरी प्रकरणाचा तपास चालवला होता. बेळगाव गोकाक रोड मार्गावरील करिकट्टी बसवण्णा मंदिरा जवळ चोरटे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून चोरट्यांना अटक केली.
अटक केल्यावर पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता त्यानी कबलापूर आणि अन्य ठिकाणी चोऱ्या केल्याचे कबूल केले .बेळगाव शहर परिसरात अनेक चोऱ्या केल्याचे त्यांनी कबूल केले आहे. त्यात होनिहाल क्रॉस जवळ दिवसा ढवळ्या चोरी,तिर्थकुंडये दिवसा ढवळ्या चोरी,मोदगा रात्रीची चोरी,उद्यमबाग मध्ये मोटार सायकल चोरी,बेळगाव ग्रामीण मध्ये दुचाकी तर कॅम्प मध्ये ऑटो रिक्षा चोरी,केलेल्यांची कबुली चोरांच्या टोळीने दिली आहे.दिली आहे.
पोलिसांनी 6 लाख 36 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने,तर अनेक दुचाकी व रिक्षा मिळून 9 लाखांचे चोरीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.या चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास केल्या बद्दल पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुमार यांनी मारिहाळ पोलिसांचे अभिनंदन केले आहे