बेळगाव एपीएमसी मध्ये परदेशातील कांदा दाखल झालाय.तुर्कस्तानमधून मागविण्यात आलेला कांदा मार्केट यार्डातील दीपक ट्रेडिंग कंपनी या दुकानात आला आहे.
अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणी कांद्याचे भाव गगनाला भिडले होते.एकशे सत्तर रुपये किलो इतक्या उच्चांकी दराने कांद्याची विक्री झाली होती.देशात कांद्याचा तुटवडा जाणवल्यामुळे केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयात केला आहे.
नवी मुंबई आणि अन्य मार्केटमधून हा कांदा विक्रीसाठी देशभरात पाठवला जात आहे.यामुळे बेळगावकर जनतेला परदेशी कांद्याची चव चाखण्याची संधी मिळाली आहे.मागील आठवड्यात बेळगाव ए पी एम सी एक नंबर कांदा 170 रु.किलो विकला गेला होता कांद्याने इतिहासात बेळगाव ए पी एम सी मधील उच्चांकी दर गाठला होता.त्या नंतर पुन्हा दराची घसरण होऊन 100 रु किलो असा झाला होता.