स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान बेळगाव केंद्राच्या वतीने बुधवारी बेळगाव रेल्वे स्थानक येथे पाळणा बसविण्यात आला. कुमारी माता, बलात्कारित मुली-माता, अनैतिक संबंध, तसेच गरिबीमुळे नवजात शिशु रस्त्यावर सोडून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा उघड्यावर पडलेल्या बालकांसाठी हे पाळणे बसविण्यात आले आहेत.
केंद्रीय दत्तक आणि पुनर्वसन संस्था नवी दिल्ली (सीएआरए CARA – कारा – Central Adoption Resource Authority) तर्फे रेल्वे स्थानकावर पाळणे ठेवावेत, अशी सूचना करण्यात आली होती.
भारतातील दत्तक संस्थांच्या कार्याचे नियमन केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या ‘कारा’ म्हणजेच ‘सेंट्रल एडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी’ मार्फत केले जाते. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे दत्तक प्रक्रिया राबवली जात असून हि दत्तक मुले देण्यासाठीची सरकार मान्य अधिकृत संस्था आहे. संगोपन आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना दत्तक देणे म्हणजे एक प्रमुख पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्बाधणी आहे. बुधवारी या पाळण्याचे लोकार्पण करण्यात आले.
बेळगावच्या रेल्वे स्थानकावर स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान आणि रेल्वे विभागाच्या वतीने नवजात अनाथ शिशूंसाठी पाळण्याचे रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.