गांधीनगर बेळगाव येथे बेळगावातील पहिल्या सीएनजी स्टेशनचे उद्घाटन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पार पडले. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) कंपनी शहरातील हे पहिले सीएनजी स्टेशन चालवणार आहे.
मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) ही हैदराबादची नामवंत कंपनी आहे. या कंपनीच्या हायड्रोकार्बन डिव्हिजनने बेळगावात गॅस पुरवठा करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. ग्राहकांना पीएनजी आणि सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या मेघा गॅसने ग्राहकांना तत्पर गॅस पुरवठा करण्याचे ठरविले आहे.
एमईआयएलने घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ‘मेघा गॅस’ या ब्रँड नेमखाली नैसर्गिक गॅस पुरवठाचे जाळे स्थापन केले आहे. आता उत्तर कर्नाटकातील दोन जिल्ह्यांमध्ये 4 सीएनजी स्टेशन उभारण्याची मेघा गॅस योजना आहे.
औद्योगिक क्षेत्रात नैसर्गिक गॅस वापरास उत्तेजन मिळावे यासाठी सर्वसमावेशक आणि आकर्षक पॅकेजेस उपलब्ध केली आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना प्रारंभी अल्पशी गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर त्यांना सुलभ हप्त्याने खर्चाची मुख्य रक्कम भरता येणार आहे.